मधमाशी
सुमारे तीन वर्षांपूर्वी अमित गोडसे हा अभियंता मुंबईतील एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. त्यावेळी दिवाळीच्या सुट्टीत तो पुणे येथील त्याच्या घरी आला तेव्हा त्याला त्याच्या बिल्डिंगमध्ये पेस्ट कंट्रोलने हजारो मधमाशा मारून टाकलेल्या आढळल्या. ते दृष्य बघून त्यास वाटले की या मधमाशांनी कोणाला काही इजा केली नव्हती तरी भीतीपोटी त्यांना उगाच मारून टाकले गेलेय. त्यास दुःख होऊन याकरता काहीतरी केले पाहिजे हा विचार त्याच्या मनात घर करून राहीला. या घटनेनंतर कितीतरी दिवस त्याने अस्वस्थतेत काढले मग आपण स्वतःच काहीतरी करावे ही जिद्द त्याने मनाशी बाळगली.