Category: Marathi
मधमाशी आणि दंशहीन?!!!
भारतामध्ये नैसर्गिक अधिवासात सापडणाऱ्या सर्व मधमाश्यांमध्ये तसेच मधमाशीपालनाकरिता वापरण्यात येणाऱ्या सर्व मधमाश्यांच्या प्रकारांमध्ये पोयाच्या माश्या म्हणजेच स्टिंगलेस बी किंवा दंशहीन मधमाश्या ह्या परागीभवनाकरिता अत्यंत योग्य ठरणाऱ्या उत्कृष्ट मधमाश्या आहेत हे आता प्रयोगांती स्पष्ट झाले आहे. दंशहीन मधमाश्या वापरून मधमाशीपालन करताना या मधमाश्यांची ठळकपणे जाणवणारी वैशिष्ट्ये :-(१) पोयाच्या माश्यांचा आकार खूप लहान असल्यामुळे या माश्या आंबा,...
निसर्गातील अनुपम रंगपंचमी!
‘शिशिर संपला, वसंत आला…’थंडीने गारठवणारा शिशिर ऋतु ‘सायोनारा’ (परत भेटेपर्यंत तूर्तास रामराम!) म्हणते वेळी वसंत ऋतुच्या आगमनाची चाहूल लागते अन् मग निसर्गात अद्भुत स्थित्यंतरे घडण्यास सुरुवात होते. शिशिरात निद्रादेवीच्या अधीन गेल्यात की काय असे वाटणाऱ्या अनेक प्रकारच्या वनस्पती वसंताची चाहूल लागताच खडबडून जाग्या होतात जणु एखादा स्वर्गातील दूतच अदृष्य रुपात येऊन मधुर आवाजात आरोळी ठोकून...
सेवाव्रती मधमाशी
मधमाशीचे निसर्गातील महत्त्व कळण्याकरिता जाणीव जागृती म्हणून बालकुमारांसाठी केलेली ‘सेवाव्रती मधमाशी’ ही बी बास्केटची सदस्य व कार्यकर्ती असलेल्या प्रिया फुलंब्रीकर यांची एक मुक्तछंद कविता बालभारतीच्या ‘किशोर’ मासिकाच्या जुलै २०२० अंकात प्रकाशित झाली. मुलांना समजेल अशा सोप्या व रंजक भाषेत मधमाशीविषयी सर्व शास्त्र या कवितेत वर्णन केलेले आहे. लहानपणीच मधमाशीबद्दल वाटणारी भीती व अज्ञान दूर होऊन...
आठवणीतला शेवगा
पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात सदाशिव पेठेत वृक्षवल्लींच्या सान्निध्यात माझे बालपण गेले. तेव्हापासून त्या हिरवाईने लावलेली माया अबाधित असून आज मानवनिर्मित प्रदूषणामुळे गांजलेल्या निसर्गासाठी थोडंफार करण्याची ऊर्जा देत आहे. एखाद्या कादंबरीत जशी पात्रं असतात तसे माझ्या अदृष्य स्वरूपातील निसर्ग पुस्तकात झाडेझुडुपे, लतावेली, इवलीशी क्षुपे, प्राणीपक्षी, दगड-धोंडे, विहीरी-हौद अशी अनेक बहुरंगी बहुढंगी पात्रं आहेत. त्यातील काही कायमची...
सदाबहार सेंद्रिय बागबगीचा
‘ सदाबहार सेंद्रिय बागबगीचा 💥🌿🐜🐞🐛🦋🕷🌸🐝🦋🌱🌾🌻’ दिवसेंदिवस लोकसंख्येचा महापूर लोटणाऱ्या शहरांमधील सिमेंटच्या जंगलात विविध तऱ्हेच्या प्रदूषणामुळे जीव अगदी घुसमटून जातो आणि मग निसर्गाकडे वळावेसे वाटते. या भावनेतूनच आपण घराच्या गच्चीवर किंवा घरास अंगण असेल तर अंगणात हौसेने बागबगीचा तयार करून त्यात आवडती फुलझाडे-फळझाडे लावतो. अगदी तेवढी सुद्धा जागा उपलब्ध नसेल तर घरातील बाल्कनीत कुंड्या ठेवून त्यात आवडती झाडे-झुडुपे लावून हिरवा...
कामकरी मधमाशी
एकदा काय गंमत झाली!सईच्या बागेत मधमाशी आलीगुणगुणत फुलांच्या ताटव्यात शिरली ||१|| सई तिला म्हणाली,“बरं झालं बाई तू इथे आली!”तेव्हा ताटव्यातली फुलं खुदकन हसली ||२|| मधमाशी गेली तिथल्या फुलांतभरभर प्यायला मधुरस झोकातअन् गोळा केले पराग पायपिशव्यांत ||३|| तेवढ्यात आला सोसाट्याचा वारामधमाशीला परत घेऊन गेला घराघरातल्या माश्यांना झाला आनंद खरा ||४|| कर्तव्यदक्ष मधमाशीने काय केले?पोळ्यातल्या राणीला अन्...
मधुबन खुशबू देता है…
अमित गोडसे नावाचा एक तरुण चक्क आयटी क्षेत्रातली नोकरी सोडून मधमाश्या संवर्धनाच्या कामाला वाहून घेतो, त्याची ही गोष्ट. त्याच्या कामामुळे त्याला ‘बी मॅन’ अशी ओळख मिळाली आहे. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज जाणून घेऊ या, त्याच्या या अनोख्या प्रवासाबद्दल...
Vedh Pune Report By Deepa Deshmukh
डॉ. आनंद नाडकणी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला वेध हा उपक्रम महाराष्ट्रातल्या १० शहरांमधून संपन्न होतो. 'स्व'च्या पलीकड ेजाऊन हा प्रवास घडतो. मात्र 'स्व'च्या पलीकड े गेलेली ही मंडळी त्या प्रवासात कशी सामील होतात, त्यांना ते वेड झपाटून कसं टाकतं आणण त्या वेडाची ककंमत देऊन ते काय साध्य करतात हे सगळं सगळं वेधमधून उलगडलं जातं. त्यांच्यासारख्या वेडयांमुळे आपल्यालाही त्यातून एक नवी दृष्ट्टी ममळते, नवी जाणीव तयार होत े आणण आयुष्ट्य जगण्याचं नवं भानही येतं.