My Cart
0.00
Blog

निसर्गसंपत्ती मधमाशी

अनेक कोटी वर्षांपूर्वी
महाकाय सागरात उलथापालथ झाली||
जीवसृष्टी पृथ्वीतलावर अवतरु लागली||१||

समुद्रातून बाहेर फेकल्या गेलेल्या वनस्पती जमिनीवर आल्या||
भूमीवरच बस्तान बांधण्याचा त्यांनी निश्चय केला||२||

सपुष्प वनस्पतींच्या पुनरुत्पत्तीकरता परागण करणारे जीव जन्मास येऊ लागले||
सुदृढ परागीकरणामुळे पृथ्वीचे सौन्दर्य वनश्रीने बहरू लागले||३||

कीटकांत ठरली मधमाशी सर्वश्रेष्ठ||
तिच्यामार्फत घडणाऱ्या परागणामुळे मानवास मिळती फळे-पिके श्रेष्ठ||४||

शहाणा मनुष्यप्राणी शक्कल लढवू लागला||
मधमाशीपालन करून कित्येक पदार्थ मिळवू लागला||५||

कालांतराने मनुष्य स्वार्थी बनला||
इतर निसर्ग घटकांना तुच्छ लेखत
त्यांचा नाश करू लागला||६||

मानवाने वेळीच जागृत व्हावे||
मधमाशीचे निसर्गातील महत्व जाणावे||७||

मधमाशी नसेल तर अन्नासाठी मनुष्याची दैना होईल||
एके दिवशी मानवजातीचा अंत होईल||८||

सुज्ञ माणसाने यावरून बोध घेणे बरे||
जीवविविधा राखणाऱ्या मधमाशीस वाचवणे भले||९||

कवयित्री – प्रिया फुलंब्रीकर
(पृथ्वीवरील जीवसृष्टीचा उगम सागरातून झाला ह्या सिद्धांतावर आधारित ‘मधमाशी वाचवा’ हा संदेश देत लोकजागृतीकरता सादर केलेली कविता.)

Leave your thought