My Cart
0.00
Blog

कामकरी मधमाशी

एकदा काय गंमत झाली!
सईच्या बागेत मधमाशी आली
गुणगुणत फुलांच्या ताटव्यात शिरली ||१||

सई तिला म्हणाली,
“बरं झालं बाई तू इथे आली!”
तेव्हा ताटव्यातली फुलं खुदकन हसली ||२||

मधमाशी गेली तिथल्या फुलांत
भरभर प्यायला मधुरस झोकात
अन् गोळा केले पराग पायपिशव्यांत ||३||

तेवढ्यात आला सोसाट्याचा वारा
मधमाशीला परत घेऊन गेला घरा
घरातल्या माश्यांना झाला आनंद खरा ||४||

कर्तव्यदक्ष मधमाशीने काय केले?
पोळ्यातल्या राणीला अन् पिल्लांना खाऊ घातले
मग सुर्यदेवाचा निरोप घेऊन सर्वजण झोपी गेले ||५||

मित्रांनो,
बघूनी मधमाशीला अखंड कार्यरत
सेवाधर्म करण्याचे सईने उचलले व्रत! ||६||

कवयित्री – प्रिया फुलंब्रीकर
टीम बी बास्केट
ग्रीन बर्ड्स अभियान संस्थापक अध्यक्ष
( बालकुमारांसाठी जागतिक मधमाशी दिन २२ मे २०२० रोजी मधमाशीचे निसर्गातील महत्व कळण्याकरिता केलेली कविता!)

Leave your thought