My Cart
0.00

निसर्ग एक अद्भुत गुंफण!

वैशाख वणव्याने अगदी होरपळून गेलेला चराचर सृष्टीतील प्रत्येक जीव ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो तो एकदाचा येतो…येतो म्हणण्यापेक्षा अवचित बरसतो आणि तृषार्त भूमीतील कणाकणास तृप्त करून टाकतो. पश्चिम घाटांमधील उघड्याबोडक्या डोंगरांवर असंख्य जलप्रपात निर्माण होतात व ते अवखळपणे कड्यांवरून कोसळू लागतात. ऋतू जसजसा आषाढाकडे मार्गक्रमण करत जातो तसे बघता-बघता त्या जलप्रपातांचे भव्य धबधब्यात रूपांतर होते....
Read more

शहर शेती

Read more

मधमाशी पूरक वनस्पती व मधमाशांकरता घ्यावयाची काळजी

आपल्याला जर आपल्या गच्चीवरील बागेत किंवा अंगणातील परसबागेत मधमाशा याव्यात असे वाटत असेल तर तिथे पुढील मधमाशी-प्रिय वनस्पतींची लागवड करावी
Read more

निसर्गसंपत्ती मधमाशी

अनेक कोटी वर्षांपूर्वी महाकाय सागरात उलथापालथ झाली|| जीवसृष्टी पृथ्वीतलावर अवतरु लागली||१|| समुद्रातून बाहेर फेकल्या गेलेल्या वनस्पती जमिनीवर आल्या|| भूमीवरच बस्तान बांधण्याचा त्यांनी निश्चय केला||२|| सपुष्प वनस्पतींच्या पुनरुत्पत्तीकरता परागण करणारे जीव जन्मास येऊ लागले|| सुदृढ परागीकरणामुळे पृथ्वीचे सौन्दर्य वनश्रीने बहरू लागले||३|| कीटकांत ठरली मधमाशी सर्वश्रेष्ठ|| तिच्यामार्फत घडणाऱ्या परागणामुळे मानवास मिळती फळे-पिके श्रेष्ठ||४|| शहाणा मनुष्यप्राणी शक्कल लढवू...
Read more

अमृततुल्य नैसर्गिक मध

मानवाच्या उत्क्रांतीच्या कितीतरी आधी पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आली तेव्हा सपुष्प वनस्पतींच्या निर्मितीबरोबर त्यांचे परागीकरण करणारे जीवदेखील उत्पन्न झाले. त्यातीलच एक परागण करणारा महत्वाचा कीटक म्हणजे ‘मधमाशी’ होय. मधमाशी हा कीटक त्यापासून आपल्याला प्रिय असणारा ‘मध’ मिळतो म्हणून सर्वाधिक परिचित आहे.    मधाला पृथ्वीतलावरील अमृत असे संबोधले जाते आणि हे वर्णन यथार्थच आहे कारण नैसर्गिक मध...
Read more

‘मधमाशांची गरज : शुद्ध पाणी आणि पर्यावरण’

 ‘मधमाशांची गरज : शुद्ध पाणी आणि पर्यावरण’     आपण नदीच्या उगमस्थानाजवळील जंगलसदृश भाग अथवा कोणत्याही लहान-मोठ्या नैसर्गिक पाणवठ्याच्या स्रोताकडील प्रदेश बारकाईने न्याहाळला तर अनेकदा त्या परिसरात किंवा नजीकच्या भागात मोठ्या झाडांवर, डोंगराच्या कपारीत मधमाशांचे एखादे तरी भले मोठे पोळे किंवा त्यांच्या अनेक वसाहती आपल्याला आढळून येतात.       मग असा प्रश्न पडतो की...
Read more

मधमाशांची सद्यस्थिती व उपाय

१९ ऑगस्ट २०१७ हा 'जागतिक मधमाशी दिन' म्हणून घोषित केलेला दिवस! या मधमाशी दिनाचे औचित्य साधून भारतातील मधमाशांची आजची सत्य परिस्थिती काय आहे याविषयी जाणून घेऊया. गेल्या लेखात मधमाशांची परागसिंचनातील महत्वाची भूमिका आपण पाहिली; तसेच मधमाशीजन्य उपयुक्त पदार्थांची माहितीदेखील आपण घेतली. यावरून मधमाशी हा निसर्गातील महत्वाचा कीटक आहे आणि ह्या छोट्याशा कीटकाचे पृथ्वीवरील अस्तित्व टिकवणे हे अखिल मानवजातीच्या कल्याणाचे आहे याचा बोध आपण घेतला.
Read more

मधमाशीजन्य उपयुक्त पदार्थ

मधमाशा ह्या परागीकरणाकरता सहाय्यकारी ठरतात हे आपण मागील भागात पाहिले. याशिवाय मधमाशांपासून मानवास अनेक उपयुक्त पदार्थ मिळतात. मधमाशांपासून मिळणारा सर्वांत लोकप्रिय पदार्थ म्हणजे ‘मध’ होय. परंतु मधमाशांपासून मधाव्यतिरिक्त मेण, पराग, रोंगण (प्रोपोलिस), राजान्न (रॉयल जेली) व विष (दंश) हे देखील अतिशय उपयुक्त पदार्थ मिळतात. मधमाशांपासून मिळणाऱ्या ह्यातील प्रत्येक पदार्थाची आपण येथे थोडक्यात माहिती घेऊ. १)...
Read more

मधमाशांचे मह्त्व व मधमाशीपालन

शहरातील रोजच्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण निवांत घालवता यावे म्हणून आपण उद्याने व बागा यांमध्ये जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होतो. आजूबाजूची हिरवीगार झाडे, मंजुळ स्वरात गाणारे पक्षी, पुष्करणी व त्यातील थुईथुई नाचणारे कारंजे, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे या सर्वांमुळे चैतन्याची अनुभूती मिळून मन प्रसन्न होते व ताजेतवाने वाटते. तेथील फुलांवर बागडणारी फुलपाखरे, फुलांभोवती अखंड गुंजारव करणारा भुंगा व फुलांभोवती गुणगुणणाऱ्या मधमाशा हे दृष्य आपल्या चांगलेच ओळखीचे आहे.
Read more

मधमाशी

सुमारे तीन वर्षांपूर्वी अमित गोडसे हा अभियंता मुंबईतील एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. त्यावेळी दिवाळीच्या सुट्टीत तो पुणे येथील त्याच्या घरी आला तेव्हा त्याला त्याच्या बिल्डिंगमध्ये पेस्ट कंट्रोलने हजारो मधमाशा मारून टाकलेल्या आढळल्या. ते दृष्य बघून त्यास वाटले की या मधमाशांनी कोणाला काही इजा केली नव्हती तरी भीतीपोटी त्यांना उगाच मारून टाकले गेलेय. त्यास दुःख होऊन याकरता काहीतरी केले पाहिजे हा विचार त्याच्या मनात घर करून राहीला. या घटनेनंतर कितीतरी दिवस त्याने अस्वस्थतेत काढले मग आपण स्वतःच काहीतरी करावे ही जिद्द त्याने मनाशी बाळगली.
Read more