मधमाशीचे निसर्गातील महत्त्व कळण्याकरिता जाणीव जागृती म्हणून बालकुमारांसाठी केलेली ‘सेवाव्रती मधमाशी’ ही बी बास्केटची सदस्य व कार्यकर्ती असलेल्या प्रिया फुलंब्रीकर यांची एक मुक्तछंद कविता बालभारतीच्या ‘किशोर’ मासिकाच्या जुलै २०२० अंकात प्रकाशित झाली.
मुलांना समजेल अशा सोप्या व रंजक भाषेत मधमाशीविषयी सर्व शास्त्र या कवितेत वर्णन केलेले आहे.
लहानपणीच मधमाशीबद्दल वाटणारी भीती व अज्ञान दूर होऊन मधमाश्यांबद्दल जिव्हाळा आणि प्रेमादर निर्माण झाल्यास मुले नक्कीच मधमाश्यांचे रक्षण करत पर्यावरण संवर्धनास हातभार लावतील अशी आशा वाटते.